Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदराला धोका होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांच्या कोट्यात बदल केला होता.
४२ ऐवजी ४४ मते टाकण्याचे ठरविण्यात आले. मात्र, यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात येत असल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा धोरण बदलले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत आधी ठरल्याप्रमाणे ४२ मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहेत.
त्यानंतर आढावा घेऊन रणनीती बदलण्यात येणार येईल. ४२ मातांचा कोटा पूर्ण झाल्यास उरलेली मते शिवसेनेच्या उमेदवारास देण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संथपणे मतदान करणार आहेत