काँग्रेस नेते राहुल गांधींनाही कोरोनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत असून अनेक राजकीय नेत्यांनाही लागण होत आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर आता राहुल गांधी करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे.

मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24