‘केंद्राच्या रुग्णवाहिकांचे श्रेय घेण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा केविलवाणा प्रयत्न’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- केंद्र सरकारच्या निधीतून घेतलेल्या रुग्णवाहिकाचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे टीकास्त्र जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सोडले आहे.

यावेळी ते म्हणाले की, मागील काळात केंद्र सरकारने चौदावा वित्त आयोग थेट ग्रामपंचायतींना दिला. त्या निधीशी ना राज्य सरकारचा संबंध ना जिल्हा परिषदेचा संबध

तरी अनाधिकाराने नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचे जवळपास २७  कोटी रुपये व्याज प्रकल्प संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांच्याकडे जमा केले.

त्यातून काही रकमेचे अर्सेनीक अलबम ३० या गोळ्या खरेदी केल्या काही रकमेतून आता रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

परंतु या रुग्णवाहिका घेण्यासाठी वापरलेला निधी हा केंद्र सरकारचा आहे असे कोणीही साधा उल्लेख  देखील केला नाही.

आता उलट तालुका तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर या नवीन आलेल्या रुग्णवाहिका उभ्या करून फोटोशेषन करत आहेत.

जसे या सर्व रुग्णवाहिका आम्हीच आणल्या, अशा अविर्भावात श्रेय घेण्याचा केविलवाणा खटाटोप चालला असल्याची टीका त्यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24