काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आपल्याच मंत्र्यांवर गैरकारभाराचे गंभीर आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रातून पटोले यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गैरकारभाराचे गंभीर आरोप केले आहे.

पटोले यांनी पत्रात महाजेनको, म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका ठेवला आहे.

महाजेनकोने दिलेल्या या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती द्यावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. कोळसा पुरवठा आणि वॉशिंगचे काम हे रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडला देण्यात आले आहे.

कंपनीचे कुठलेही नेटवर्थ नाही. कंपनीचा टर्नओव्हर नाही. कंपनीला सेक्युरिटी क्लियरन्स नाही. कंपनीला कोळसा वॉशिंगचा कुठलाही अनुभव नाही.

कंपनीने ज्या कंपनीसह जेव्ही केले आहे. ती कंपनी काळ्या यादीत आहे. अटी, शर्ती पूर्ण केल्या नसताना गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. महाजेनकोला हे वेळेवर कोळसा पुरवठा करू शकणार नाही. याचा परिणाम महाजेनकोच्या वीज उत्पादनावर होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24