अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल आहे. त्यासंदर्भात आज चर्चा झाली.
त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या पहिल्यापेक्षा कमी झाली असल्याने राज्याचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली.
याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं. १५ मे रोजी ब्रेक द चेन अंतर्गत असलेली कडक निर्बंध नियमावलीचा कालावधी संपत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार इथून पुढे ही लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
त्यावर अनेक सदस्यांनी लॉकडाऊन वाढवण्याकडे कल दिला. दरम्यान कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही.
त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.