अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने पालकांच्या संमतीने राहुरी तालुक्यातील मानोरी शाळेचे आठवी ते दहावी वर्ग सुरु होणार आहे. पुन्हा शाळांची घंटा खणखणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अंबिका माध्यमिक विद्यालयात शिक्षक व पालक मेळावा आयोजित करून कोरोनामुक्त आकडेवारी लक्षात घेता आठवी ते दहावी वर्ग दि.३० जुलै पासून सुरू करण्याबाबत पालकांनी स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला आहे.
पालकांच्या स्वयंस्फूर्ती निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पालक मेळाव्यात डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, सरपंच आब्बासभाई शेख,निवृत्ती आढाव,शिवाजी थोरात,जैनुद्दीन शेख, सुभाष चोथे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड,
अनिल तनपुरे, लताब पठाण, नानासाहेब तनपुरे, चंद्रभान आढाव, भाऊराव आढाव,पिरखाभाई पठाण, नानासाहेब शेलार, बाबासाहेब कळमकर ,माधव पिले, चंद्रकांत आढाव,अशोक खुळे, भाऊसाहेब थोरात, बन्सीभाई शेख, भाऊसाहेब सोडनर, गणेश थोरात,
देवीदास वाघ, बाबुराव जाधव आदी पालकांसह मुख्याध्यापक जी.बी घोलप, एस.ऐ. गुंजाळ, एम.आर.सोंडकर,पी.के. तांबे, बी.एन विटनोर,जी व्हि.म्हसे, रवींद्र.देवरे आदी शिक्षक उपस्थित होते.