शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन, तो निर्णय झाला रद्द !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- इंदापूरच्या खडकवासला कालव्यात उजनीचे पाच टीएमसी पाणी सोडण्याच्या योजनेचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली होती. निर्णय रद्द झाल्याने कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह पाणी योजनांसाठी अवलंबून असणाऱ्या गावांनीही सुस्कारा सोडला आहे.

22 एप्रिल रोजी उजनीतून पाणी उचलण्याच्या निर्णयावर शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. याच मंजुरीच्या विषयावर कर्जत तालुक्‍यातील खेड, भांबोरे, बारडगाव सुद्रिक, शिंपोरे आदी ग्रामपंचायतींनी तातडीने तहसीलदार नानासाहेब आगळे,

नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना निवेदने देऊन विरोध दर्शविला होता. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जबाबदार धरले होते.

पाणी उचलल्याने उजनीच्या फुगवटयावर अवलंबून असलेल्या कर्जत तालुक्‍यातील अनेक गावांच्या पाणी योजनांवर संकट ओढवेल असते.

उजनीतून पाणी उचलण्याचा निर्णयास कर्जत-करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केलेला विरोध आणि याप्रश्‍नी शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन,

पाणी उचलण्याच्या निर्णय घेण्यात आघाडीवर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनाच हा निर्णय रद्द करावा लागल्याने कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24