रुग्णांची गैरसोय पाहता आरोग्य केंद्रसाठी नव्याने 45 ऍम्ब्युलन्स येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र असून या अंतर्गत 555 उपकेंद्रांचा समावेश आहे. यातील 45 ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत होते.

यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या ठिकाणी नव्याने रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या 45 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने 45 रुग्ण वाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून सुमारे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. हा विषय जिल्हा परिषदेच्या 26 तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेला आहे.

रुग्ण वाहिकांसाठी आता कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यातून ग्रामीण भागात तातडीच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार आहे.

या खरेदीला जिल्हा परिषद प्रशासनाने मान्यता दिली असून योजनेच्या प्रशासकीय मान्यतेस कार्योत्तर मिळण्यासाठी सर्वसाधारण सभे समोर हा विषय ठेवण्यात आला आहे. ही सर्वसाधारण सभाही येत्या 26 तारखेला होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24