अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोविडची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचआरसीटी (स्कॅन) तपासणी करावी लागते. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येतात.
यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी दर कमी करण्याची विनंती संबंधित निदान केंद्रांना केली होती.
यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून २३०० रुपये दर केला. या निर्णयाचा गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोविडचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवनवे व्यक्ती बाधित होत आहेत. विषाणूची लागण झाली आहे
का नाही याचे निदान करण्यासाठी डॉक्टर एचआरसीटी (स्कॅन) करण्यास सांगतात. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण होत होती.
याची दखल घेऊन शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी तहसीलदारांसह संबंधित निदान केंद्रांना दर कमी करण्याची विनंती केली होती.
त्यास यश मिळाले असून गणपती सीटी स्कॅन व संत जनार्दन हॉस्पिटल या दोन केंद्रांनी दर कमी करून २३०० रुपये केले. या निर्णयाचा गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने त्यांनी कोपरगाव शिवसेनेचे आभार मानले.
ज्या नागरिकांना कोरोना संबंधित कुठलीही अडचण येत असेल, त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन राजेंद्र झावरे व कलविंदरसिंग दडियाल यांनी केले.