अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- दक्षिण महाराष्ट्रात येत्या १६ जुलैपर्यंत पावसाची हजेरी असणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत बऱ्यापैकी पाऊस हजेरी लावणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख रवींद्र आंधळे यांनी दिली.
जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीप पिकाला दिलासा मिळणार आहे.
पावसाने पाणी साचलेल्या कल जमिनीतील पाणी बाहेर काढून द्यावे. कपाशी व इतर अन्य पिकातील येत्या तीन-चार दिवसांत औषधाची फवारणी करू नये. फारच आवश्यकता वाटल्यास स्टकरचा वापर करावा.
समाधानकारक पावसाने खरीप पिकाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, असेही हवामान विभाग प्रमुख रवींद्र आंधळे यांनी सांगितले.