ताज्या बातम्या

नगरकरांसाठी दिलासादायक बातमी..जिल्ह्यातील तब्बल एवढी गावे झाली काेराेनामुक्त

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी झाला आहे. जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये एकही काेराेनाचा रुग्ण नसल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान जिल्‍ह्यातील कोरोना संदर्भात सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय आयोजित बैठकीत आढावा घेतला.

यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्‍हणाले, जिल्‍ह्यात कोविड रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण ९८ टक्‍के असून जिल्‍ह्यातील ९८ गावांमध्‍ये कोरोनाचा एकही रुग्‍ण नाही.

आठवड्यातील रुग्‍ण बाधितांचे प्रमाण १.५३ टक्‍के असून जिल्‍ह्यात सध्‍या ६२६ सक्रीय रुग्‍ण आहेत. लसीकरणाबाबत माहिती देताना मुश्रीफ म्हणाले, कोरोना लसीकरणामध्‍ये १८ वर्षावरील व्‍यक्‍तींचे पहिला डोस घेणा-यांचे प्रमाण ८४ टक्‍के असून दुसरा डोस घेणा-यांचे प्रमाण ६१ टक्‍के इतके आहे.

तर १५ ते १७ या वयोगटातील ७२ टक्‍के युवकांनी पहिला डोस घेतला असून ४१ टक्‍के युवकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे १५ हजार ३३६ ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले असून

या अर्जांपैकी १० हजार ४०१ अर्जांना सानुग्रह अनुदानासाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. यासाठी ४५ कोटी रुपये रक्‍कम मंजुर करण्‍यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office