अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपूर मतदार संघातील ॲम्बुलन्स नसणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्बुलन्स देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती.
त्यानुसार ग्रामविकास मंत्र्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली.
त्यातून सहा रुग्णवाहिका श्रीरामपूरला मिळणार आहेत. माळवाडगाव आरोग्य केंद्रात एका गरोदर महिलेला ॲम्बुलन्स न मिळाल्याने हेळसांड झाल्याचे प्रकरण आमदार कानडे यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन व प्रत्यक्ष खानापूर येथील आदिवासी वस्तीला भेटून शासन दरबारी मांडले होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव, बेलापूर, निमगाव खैरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया आणि मांजरी अशाप्रकारे मतदारसंघातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अॅम्ब्युलन्स मंजूर झाल्या आहेत.