बांधकाम विभागाच्या अभियंता व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व त्यांचे कर्मचारी एका ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले असताना त्यांना एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडला आहे. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी कुलांगे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार दत्तात्रय हरीभाऊ जाधव (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) याच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चिंचोडी पाटील येथील बसस्थानकाजवळ जाधव याचे दुकान आहे.

हे दुकान राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने कुलांगे आपल्या पथकासह जाधव याचे दुकान हटविण्यासाठी गेले होते.

यावेळी जाधव याने आमच्या सहकार्‍यांसह मला शिवीगाळ केली. तसेच माझ्या दुकानासमोरील जागा तुमच्या बापाची आहे का? असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण करून लाथाबुक्क्यांनी व चापटीने मारहाण केली.

परत जर येथे काम करण्यासाठी आले तर जिवे मारून टाकील अशी धमकी दिल्याचे कुलांगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24