अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सध्या देशात बँकांच्या खासगीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. यामुळे आजपासून देशात बँका दोन दिवसीय संपवार आहे.
एकीकडे हे सर्व सुरु असताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर बीआरएलएलआर 6.85 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
या कपातीनंतर गृह कर्जावरील व्याज दर 6.75 टक्के होईल. या व्यतिरिक्त वाहन कर्जावर 7 टक्के असेल. तसेच, तारण कर्जावरील 7.95 टक्के आणि शिक्षण कर्जावर 6.75 टक्के असणार आहे.
आजपासून बँकेचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच ग्राहकांना आजपासून स्वस्त दरात कर्ज मिळेल. व्याजदरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना गृहकर्ज, तारण कर्ज, वाहन कर्ज , शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्जे घेताना लाभ होणार आहे.
ICICI :- आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत. गेल्या दहा वर्षात बँकेचा हा सर्वात स्वस्त गृह कर्जाचा दर आहे. हा कर्ज दर आजपासून लागू करण्यात आला आहे.
SBI :- स्टेट बँक ऑफ इंडियाने सिबिल स्कोअरच्या आधारावर गृह कर्जात जवळपास 0.1 टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज 6.70 च्या किमान व्याजदराचे झाले आहे.
HDFC :- एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी गृह कर्जावर व्याज दरात 5 बेसिस प्वाईंट म्हणजेच 0.05 टक्के कपात केली आहे. गृह कर्जाचा इतिहास चांगला असणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट ग्राहकांना’ 6.75 टक्के व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध होईल.