९ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणी योजनेतून गावाला दूषित पाणी पुरवठा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील २० हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीमियाॅ गावात शासनाने ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित झाली असुन हि योजना पूर्णत असफल झाली असुन संपुर्ण गावाला पिण्यासाठी दुषित पाणी होत असुन मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र त्यामुळे जीवन प्राधिकरणाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ते नियोजन करावे तसेच जलसंपदा मंञी जयंत पाटील,माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री मंञी प्राजक्त तनपुरे यांनी दखल घ्यावी अशी पंचायत समिती सदस्या सुनिता सुरेश निमसेंसह ग्रामस्थांनी केली आहे.

टाकळीमियाॅ (ता.राहुरी) येथील गावासाठी मे २०१७ झाली गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज योजनेतून ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पुर्ण करण्यात आली.

फेब्रुवारी २०२१ मधे योजना पूर्ण झाली असून हि योजना टाकळीमिया ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्यानंतर आज अखेर सहा महिने झाले तरी या गावाला संपूर्ण दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण गावाला दूषित पाणीपुरवठा होत असून आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने शुद्ध असल्याचा अहवाल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्यामुळे लवकरच या योजनेचे दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच विश्वनाथ निकम,सुरेश भानुदास करपे,अकबर सय्यद, आण्णासाहेब सगळगिरे,बाळासाहेब माने,जनार्दन गोसावी आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.

मुसळवाडी तलावातुन पाणी शुद्धीकरण्यासाठी टाकळीमिया पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रात येते.येणारे पाणी हे अतिशय दुषीत प्रमाणात आहे.त्यातुनच संपुर्ण गावाला दुषीत पाणी पुरवठा होतो. ग्रामपंचायतीला हे पाणी शुद्ध करण्यासाठी मासिक तीन लाख रूपये खर्च येतो.तरीही समस्या कायम आहे.

याठिकाणी तात्काळ संपुर्ण तलावाला कुंपण भिंत व तलावातील गाळ काढणे अंत्यत गरजेचे असल्याचे सुरेश निमसे यांनी सांगितले. टाकळीमियाॅ गावातील पिण्याचे पिण्याचे नमुने आपण दर महिन्याला प्रयोगशाळेत पाठवत असतो.

या महिन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही परंतु मागील चार महिन्याचे अहवाल हा शुद्ध पाणी असल्याचा आलेला आहे. असे वैद्यकीय अधिकारी डाॅ.किर्ती मदने यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office