मास्कचा सतत वापर देऊ शकतो ‘या’ गंभीर आजाराला निमंत्रण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  कोरोनाकाळात तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. तोंडावर मास्क नसेल, तर सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी मास्क गरजेचाच आहे. त्यामुळे प्रत्येक जण मास्कचा वापर करताना दिसत आहे. कोरोनाचा नव्हे, तर इतरही संसर्गजन्य आजारांपासून मास्कमुळे बचाव होऊ शकतो. मात्र, मास्कचा अति वापरही धोकादायक ठरू शकतो, असे आता वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

कोरोनाकाळात आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र एकीकडे हि परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र मास्कचा सततचा वापरही धोकादायक ठरू शकतो. अशीमाहिती समोर येऊ लागली आहे.

यामुळे नागरिक देखील पेचात पडले आहे. चेहऱ्यावरील सततचा मास्क हा बुरशीजन्य आजारास निमंत्रण ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही एकटे असाल किंवा घरात असाल, तर मास्क न वापरलेलाच बरा,

असा सल्ला आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देऊ लागले आहेत. तसेच सतत मास्कचा वापर केल्याने अनेकांना श्वसनाचे विकार देखील जडले होते.यामुळे मास्कचा वापर करताना काळजी घ्यावी.

बुरशीजन्य आजार उद्भवू शकतात

सतत तोंडावर मास्क असल्यामुळे त्या जागेवर घाम येतो. घामामुळे बुरशीजन्य आजार उद्भवू शकतात, तसेच इतर श्वसनाचे आजारही होऊ शकतात.

सतत मास्क वापरल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्वचेला खाज सुटण्याचे प्रकारही वाढत आहेत. मास्कच्या जागेवरील त्वचेचा रंग बदलल्याचे प्रकारही समोर येत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24