अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली महानगरपालिकेतील ठेकेदारांचे 50 हजार आतील रक्कमेचे देयके देण्याची मागणी ठेकेदार संघटनेच्यावतीने करण्यात होती.
या बाबीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने 25 जानेवारीला महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय गेट जवळ उपोषणाला ठेकेदार संघटनेच्या वतीने बसले होते
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेचे प्रभारीआयुक्त पद असल्याने त्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडवावे असे सांगितले गेले.
त्यानुसार आम्ही 28 जानेवारीला मुख्य लेखा अधिकारी यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले होते त्यानंतर आम्ही महानगरपालिकेचे आयुक्तांना भेटलो असता त्यांनी देखिल आश्वासन दिले की मार्च अखेरच्या आत देयके अदा होतील तसे आदेश ही संबंधित विभागाला गेल्याचे समजले.
परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मागील दोन वर्षापासून हातात कोणतेही कामे नाही व आमचे छोटे ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून काही ठेकेदारांच्या कुटुंबियांवर कोरोणाचे सावट देखील आलेले आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
तसेच लॉकडाऊन वाढतच चालल्याने आम्ही सर्व ठेकेदारांना कोणताही काम नसल्याने उपासमारीची वेळ येत असल्याने शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या हा एकमेव पर्याय उरेल. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून छोटे ठेकेदारांची देयके लवकरात लवकर अदा करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली.