अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील दोघांनी महिलेला बळजबरीने ओढून नेऊन तीह विनयभंग केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना आरोपी प्रसाद महाले व त्याचा भाऊ गौरव महाले या दोघांनी तिला उसाचे शेतात ओढले व तिच्या अंगावरील कंपडे फाडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
त्या महिलेची तिच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या आरोपीनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली आहे.
व जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली असल्याची फिर्याद या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
यावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद महाले व गौरव महाले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याआधी परस्पर विरोधी आधी मनीषा प्रसाद महाले या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला असून
त्यात त्यांनी वरील विनय भंगाबाबत तक्रार करणाऱ्या महिलेच्या व तिच्या अन्य नातेवाईक आरोपी मीनाक्षी भगवान दास महाले, भगवान दास पंढरीनाथ महाले, रचना शिवाजी महाले, शिवाजी पंढरीनाथ महाले, रंजना रामदास महाले,
रामदास पंढरीनाथ महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यात वरील आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घराबाहेर येत धमकावल्याचे म्हंटले आहे. तसेच शिवीगाळ व मारहाण केली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.