राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीचा वाद हायकोर्टात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्तीत केली होती. मात्र आता या निवडीवरून वाद उपस्थित झाला आहे.

यामुळे हा वाद हायकोर्टात पोहचला आहे. दरम्यान निवडीच्या या वादावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज गुरूवारी होत आहे.

ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. कुलगुरु निवडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कुलगुरु निवडी प्रकरणी नोटीस काढण्यात आल्या असून आज 4 मार्चला सुनावणी होणार आहे. डॉ. एस.के.पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे.

डॉ.एस.के.पाटील यांनी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निवडीबाबत आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस.वी.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील यांच्यासह इतरांना नोटीस काढली आहे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24