पारनेर तालुक्यातील लसीकरणात सुसूत्रता आणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- काेरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा तालुक्यात बोजवारा उडाला. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावर अनेकदा हेलपाटे मारूनही लसीकरण होत नाही.

ही परिस्थिती बदलण्यासाठी लसीकरण मोहिमेत सूसूत्रता आणावी, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. त्यातही पहिली मात्रा, दुसरी मात्रा, लसीचा प्रकार अश्या पध्दतीने लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते.

त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर आपल्या वयोगटाच्या लसीकरणाचे सत्र नसेल तर परत फिरावे लागते. त्यामुळे अनेकदा हेलपाटे मारूनही लसीची मात्रा मिळत नाही. त्याचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण होते.त्यामुळे सध्याच्या लसीकरण कार्यक्रमात बदल करणे शक्य नाही. लसीकरणातील गोंधळ दूर करण्यासाठी आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

अहमदनगर लाईव्ह 24