अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्नांना रुग्णालयांमध्ये योग्य दरात उपचार मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
यातच करोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी अवाच्या सव्वा दर आकारणार्या खासगी रुग्णालयांना राज्य सरकारने वेसण घातली आहे. याबाबतच्या अधिसूचनेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.
खासगी रुग्णालयांत कोविडबाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली.
आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.
अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल. पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.
अ वर्ग शहरांसाठी 4000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 3000 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च आणि जेवण याचा समावेश.
करोना चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
व्हेंटीलेटरसह आयसीयू आणि विलगीकरण