अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात पोर्टलवरील नोंदीनुसार काल दिवसभरात १८ जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे तर ॲक्टिव रुग्णांची संख्या आता ३ हजार ५६० झाली आहे.
दिवसभरात ६१० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत पोर्टलवरील नोंदीनुसार ६ हजार ८६ झाली आहे. मंगळवारी ही संख्या ६ हजार ६८ होती.
दिवसभरात १८ मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी ५२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार ७८४ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ५६० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८९ आणि अँटीजेन चाचणीत ३६६ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २, अकोले १, नगर ग्रामीण १५, नेवासे १, पारनेर १, पाथर्डी ९, संगमनेर २१, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.