अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे.
राहत्याने रविवारी कोरोनाचे 400 रुग्ण आढळून आले आहे. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 73, खासगी रुग्णालयात 151 तर अँटीजन चाचणीत 177 रग्ण आढळून आले आहेत.
तर 311 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तालुक्यात सर्वाधिक राहाता शहरात 76, चितळीत 37 तर लोणी बुदुक 50 असे रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या तालुक्यात लसीकरणाची व्यवस्था विविध ठिकाणी करावी लागणार आहे. काही ठिकाणी रेमडीसीवीर इंजेक्शन नसून त्या ठिकाणी रुग्ण संख्या अधिक आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत आहे.