अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे. आज महाराष्ट्रात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
तर तब्बल २४९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील ८ जिल्हे हे देशातील टॉप १० कोरोना सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय होतेय. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात येत आहेत.
मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात येत नाहीये. दररोज महाराष्ट्रातील नव्या रुग्णांची संख्या ही गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा जास्त म्हणजेच ३० ते ४० हजाराच्या घरात जातेय. आज तर रुग्णसंख्येने ४० हजाराचाही टप्पा ओलांडला आहे.