नगर तालुक्यात कोरोना दाखल!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-नगर तालुक्यातील जेऊर येथे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने गावामध्ये कोरोनाची रि-एन्ट्री झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

जेऊर गणात सर्वप्रथम डोंगरगण येथे कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जेऊर येथे जून २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. ऑक्टोबर २०२० नंतर जेऊर गावामध्ये एकही रुग्ण आढळून आला नव्हता.

तब्बल चार महिन्याच्या कालावधीनंतर चालू आठवड्यात जेऊर गावांमध्ये रुग्ण आढळून आल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आजतागायत ३९८ रुग्ण आढळून आलेले आहेत. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणुने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24