अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीत आटोक्यात असल्याने पाहायला मिळते आहे.
नुकतेच श्रीरामपूर गेल्या 24 तासात 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात विविध पक्षातील राजकीय लोकांंना करोनाने विळखा घातला आहे.
शुक्रवारी श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 1, खासगी रुग्णालयांमध्ये 16 तर अँटीजन चाचणी तपासणीत 4 असे 21 रुग्ण आढळून आले आहेत.
तर करोनाचे उपचार करुन एकूण 13 रुग्ण घरी पाठविण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसापासून श्रीरामपूर शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.