अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. संशोधक कोरोनावर औषधे शोधतच आहे. यातच काही कोरोना प्रतिबंधात्मक लस देखील शोधण्यात आल्या तर अद्यापही कोरोनावर खात्रीशीर औषध मिळाले नाहीये.
मात्र आता एक अजबच दावा एका डॉक्टरने केला आहे. दारू हा कोरोनावरील उपाय आहे. दारूच्या सहाय्याने पन्नासहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे केल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला आहे.
याबाबतची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांच्या नावाने एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘दारूचा काढा’ कोरोना बाधितांना दिल्यास रुग्ण बरा होतो.
मी दारूचे समर्थन करत नाही, परंतु आजपर्यंत बेड न मिळालेल्या ५० कोरोनाबाधित रुग्णांना त्या आधारे बरे केले आहे. आजही काही उपचार घेत आहेत. यामध्ये माझ्या अनुभवानुसार सत्यता आढळून आली असून पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकतो.
शेवगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी बोधेगाव येथील संबंधित डॉक्टरांची भेट घेतली. तसेच ते म्हणाले कि, रुग्णांची दिशाभूल करू नका. अशा पोस्ट व्हायरल करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नका.