अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.
तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत.
दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे.
अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत.
सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.