कोरोना पुन्हा वाढतोय, आपले कुटुंब कोरोनापासून दूर ठेवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- कोरोना पुन्हा वाढतोय, खबरदारी उपाययोजनांचा अवलंब करा आणि आपल्यासह आपले कुटुंब कोरोना महामारीपासून दूर ठेवा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांनी केले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक व डॉक्टरांना कोरोना लसीकरण करण्यात आले, या वेळी सौ. घुले बोलत होत्या. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हिरानी, दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे, साई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पवार, सरपंच सुभाष पवार, उपसरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे व परिसरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर उपस्थित होते.

या वेळी ग्रामीण पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य अशोक वाघ, शंकर मरकड यांनी अध्यक्षा राजश्रीताई घुले व डॉ. कैलास कानडे यांच्याकडे करण्यात आली. डॉ. कैलास कानडे यांनी आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24