कोरोना: ‘या’ देवस्थानकडून प्रशासनास ६ लाखांचे साहित्य भेट!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-आज प्रत्येकजण कोरोनाचा सावटाखाली जगत आहे. या कठीण काळात अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत.

यात पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने सहा लाख रुपये किमतीच्या कोरोना तपासणीच्या (अँन्टीजन) पाच हजार कीट प्रशसानाला भेट देण्यात आल्या.

देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, रवि आरोळे व बबन मरकड यांनी शुक्रवारी प्रांतअधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर, तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांच्याकडे या कीट सुपुर्द केल्या. कोरोनाचा जेथे जास्त प्रसार झाला आहे.

त्या गावात तपासणी करुन कोरोनाची ही साखळी थांबविण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. कोरोनाच्या दिवसेदिवस वाढत्या परस्थीतीमध्येअँन्टीजन चाचणी किटचा तुटवडा भासत आहे.

त्यामुळे तालुका महसुल प्रशसानाच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड व त्यांच्या सहका-यांनी देवस्थान मार्फत पाच हजार कीट प्रशसानाला भेट दिल्या. पोलिस कर्मचा-यांना देखील फेसग्रील्ड,मास्क, सँनीटायझर असे साहीत्य भेट देण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24