Corona : अमेरिकेतील (US) पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील (Pennsylvania University ) संशोधक हेन्री डॅनियल्स (Researchers Henry Daniels) यांनी एक च्युइंगम (chewing gum) विकसित केला आहे जो कोरोना विषाणूसाठी (corona virus) “सापळा” म्हणून काम करतो.
ही च्युइंगम खाणारी व्यक्ती इतरांना संसर्ग करू शकणार नाही. आगामी काळात कोरोना रोखण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. शास्त्रज्ञ लवकरच या च्युइंगमची मानवी चाचणी सुरू करण्याचा विचार करत आहेत.
अशा प्रकारे च्युइंगगम कार्य करते :- जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणू (SARS-CoV-2) ची लागण होते आणि तो शिंकतो, खोकतो किंवा बोलतो तेव्हा त्यातून विषाणूचे कण बाहेर पडतात, जे इतरांपर्यंत सहज पोहोचू शकतात.
पण कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड पासून बनविलेले हे नवीन च्युइंगम लाळेतील विषाणूचा भार कमी करते आणि ते ACE2 प्रथिनांच्या सापळ्यात अडकवते, ज्यामुळे त्याच्या संक्रमणाचा धोका कमी होतो.
त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की त्यांच्या टीमने रोपातून उगवलेले ACE2 प्रथिने असलेले विशेष च्युइंगम तयार केले आहे, जे लाळेमध्येच ACE2 प्रोटीनसह विषाणू अडकून संक्रमणाचा प्रसार रोखते.
मानवी चाचणी लवकरच सुरू होईल :- बायोमटेरियल्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात म्हटले आहे की, “CTB-ACE2 च्युइंग गम विषाणूजन्य कणांना कार्यक्षमतेने प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे, या संशोधनात 20 नमुने समाविष्ट आहेत, ज्यामध्ये 17 नमुन्यांमध्ये चाचणी दरम्यान कोणतेही विषाणूचे कण आढळले नाहीत.
संशोधक आता मानवी ऑगस्टमध्ये चाचण्या सुरू होणार आहेत. यामध्ये कोविड-19 ची लागण झालेल्या व्यक्तींना चार दिवसांत चार ACE2 च्युइंगम चघळण्यास सांगितले जाईल आणि त्यांच्या उपचारापूर्वी आणि उपचारानंतरच्या लाळेचे नमुने विश्लेषणासाठी सादर केले जातील. प्रयोग यशस्वी झाल्यास , तर येत्या काळात जगाजवळ अशी च्युइंगमही असेल जी व्हायरल किंवा बॅक्टेरियाला थांबवण्यास सक्षम असेल.