कोरोनाने अनाथ झालेल्यांना ‘या’ शाळेत मिळणार मोफत शिक्षण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- pकोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्काचा भार श्री संत गजानन महाविद्यालय उचलणार असून, त्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

याबाबतची माहिती संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजय गोलेकर यांनी दिली आहे. दरम्यान या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. खर्डा येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

पवार यांनीही या उप्रकमाचे स्वागत केले. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले आहे. दरम्यान या उपक्रमाबाबत बोलताना शालेय शिक्षण संस्थेचे सचिव महेश गोलेकर म्हणाले, समाज म्हणून आपण त्यांचे आई-वडील होऊ शकत नसलो तरी आई-वडिलांची भूमिका पार पाडू शकतो.

या दृष्टिकोनातून महाविद्यालय आपला खारीचा वाटा उचलत आहे. जामखेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक शुल्काचा भार संस्थेने उचलल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासंबंधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office