कोरोना प्रादुर्भाव… या ठिकाणची महाशिवरात्री यात्रोत्सव रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहे. तसेच काही उत्सव हे रद्द देखील करण्यात आले आहे.

दरम्यान या महिन्यात महादेव श्रीशंकर यांचा महाशिवरात्र उत्सव येत असून या सणवार देखील कोरोनाचे सावट कायम आहे. नुकतेच अकोले येथील अगस्ती आश्रम येथील महाशिवरात्रीची दि. 11 मार्च ते 12 मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा करोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी दिली. अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापी सध्या करोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासकीय निर्बंध लक्षात घेता यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे धुमाळ स्पष्ट केले. व्यापार्‍यांनी व विक्रेत्यांनी आपला खेळणी, प्रसाद, रहाटगाडगे, पाळणे किंवा इतर कोणताही माल विक्रीस आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शिवाय यात्रेच्या दुसर्‍या दिवशी होणारा राज्यव्यापी कुस्त्यांचा हगामा देखील रद्द करण्यात आला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. फक्त शासकीय नियमांच्या अधीन राहून अगस्ती आश्रमातील अगस्ती महाराजांची विधीवत पूजाअर्चा व दर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24