अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला आहे. कालच्या प्रमाणे आजही मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून आले आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ४५२ नवीन रूग्णांची भर पडली.
आज ३६२ रूग्णांना घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५२ ने वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
नगर मनपा हद्दीत सर्वाधिक 123 रूग्णांची नोंद झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात ४६ तर राहता तालुक्यात ७०, संगमनेर ४६, पारनेर २८, नगर ग्रामीण १०, शेवगाव ५, पाथर्डी १५, कर्जत १७, जामखेड ९ असे नवीन बाधित आढळून आले आहे.