अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-सध्या देशात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे ‘ बेक्र द चेन ‘ अंतर्गत राज्य शासनाकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार लग्न समारंभासाठी फक्त दोन तास हॉल बुक करता येणार असून, लग्नाला फक्त २५ जण उपस्थित राहू शकतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याशिवाय कोविड निर्बंध लागू असेपर्यंत सदर हॉल बंद ठेवावा लागणार आहे.
यामुळे गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी p ओस पडली असून, त्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक लग्नतिथी असूनही कोरोनामुळे मात्र सर्व विवाहसोहळे रद्द झाले आहेत. सध्या १५ मे पर्यंत निर्बंध अधिक कडक केले आहेत.
ते आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकांनी मंगल कार्यालयाला पसंती न देता घरासमोरच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नियमानुसार लग्नसोहळा उरकण्याचे निश्चित केले आहे.विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कुलदैवतांचा जागर करण्याची प्रथा आहे.
जागरण, गोंधळ घालण्याचा सध्या हंगाम असताना कोरानामुळे जागरण – गोधळ घालणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विवाह संस्काराला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दोन्हीकडील कुटुंबामध्ये या निमित्ताने मोठा उत्साह असतो.
तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठा खर्चही केला जातो. परंतु ते सगळे थांबवून अत्यंत साधेपणाने लग्न करण्याची किंवा तो सोहळा पुढे ढकलण्याची वेळ कोरोनाने सर्वांवर आणली आहे. कोरोनामुळे मंगल कार्यालय, लॉन्स व्यवसायिकांचे कंबरडे मोडले असून,
आचारी व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांसोबतच लग्न समारंभ या हंगामात पूर्णपणे बंद राहणार असल्याचे संकेत मिळत असल्याने व्यवसायिकां च्या मनात धस्स झाले आहे . विवाह सोहळ्याशी निगडीत सर्व व्यवसाय अडचणीत आले आहेत.