अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. कोरोनाची हि वाढ जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे.
यातच अनेक गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात संगमनेर , पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा हे करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या ठिकाणी करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रातांधिकारी आणि तहसीदार यांना दिले आहेत. पारनेर तालुक्यातील 43 गावात लॉकडाऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल पारनेर तालुक्याला भेट देत करोनाचा आढावा घेत तालुक्यातील संवेदनाशील 43 गावे 8 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यात महिनाभरापासून करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून सरासरी 100 ते 150 नवे रुग्णसमोर येत आहेत. यामुळे तालुक्यातील 43 गावात 8 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई शेवगाव येथील तालुका प्रशासनानेही एका ठिकाणी लग्न समारंभ सुरु असून नियमांपेक्षा जास्त गर्दी जमल्याची माहिती मिळताच पथकामार्फत तेथे कारवाई केली.
संबंधित मंगलकार्यालयाचा मालक आणि वधू-वर आणि त्यांचे आई वडील यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, करोना संससर्ग वाढत असल्याने सर्व व्यवहार बंद करणे अपेक्षित आहे.
आता जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांच्यामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पायमल्ली कऱणार्यांवर कडक कार्यवाही केली जात आहे. केवळ दंड नव्हे तर आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आस्थापना करोना प्रादुर्भाव संपेपर्यंत बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.