अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-कोरोनाने परत एकदा आपले हातपाय पसरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . याचा परिणाम मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. यात तब्बल ४ मंत्र्यांचा देखील समावेश आहे.
नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे , जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.
आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या मुंबईतील घरातील दोन जण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे. ब
च्चू कडूंना यापूर्वीही संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते. दरम्यान माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.
मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.असे ट्विट केले आहे.