अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- राज्यभर कोरोनाचा फास परत एकदा घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर नियमावली केली असून यात विनामास्क आढळल्यास तब्बल एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी होणार असून नियमांच उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे.
यात मास्क वापरणे अनिवार्य, मास्क नसेल तर ५०९ रुपये दंड, दुसऱ्यांदा मास्क न घातल्याचे आढळल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
मास्क कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. लग्न समारंभासाठी ५० पेक्षा जास्त लोक नकोत.धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी झाल्यास कारवाई, सरकारी कार्यालयांत गर्दी टाळण्यासाठी नोडल ऑफिसची नियुक्ती.
जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला ७ कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ३ हजार ३९९ ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी १५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाढत्या कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली असून, नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.