टीम इंडियाला कोरोनाचा विळखा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावर कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं दोन्ही संघांना आयसोलेट करण्यात आले आहे.

दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच आज स्थगित झालेला दुसरा टी-२० सामना उद्या (बुधवारी) खेळला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज दुसऱ्या टी-२० सामन्याचा थरार होणार होता. परंतु टीम इंडियाचा फिरकीपटू क्रृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली असून हा सामना स्थगित करण्यात आला आहे.

बीसीसीआयने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, क्रृणाल पांड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजचा सामना स्थगित करण्यात आला असून हा सामना उद्या २८ जुलै (बुधवार) खेळवण्यात येणार आहे.

मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची टेस्ट करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू क्रृणाल पांड्याचा अहवाल सकारात्मक आला.

त्यामुळे वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात ८ खेळाडू आल्याचे सांगितले आहे आणि ते विलगिकरणात आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडूंची RT-PCR टेस्ट होणार आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच जाहीर केला जाईल.

अहमदनगर लाईव्ह 24