अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- निंबळक गटाचे टाकळी खातगाव येथे असलेल्या आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.
निंबळक येथील माजी सरपंच विलास लामखडे यांनी आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी टाकळी खातगावचे सरपंच सुनिल नरवडे, वैद्यकिय अधिकारी डॉ.शंकर केदार, प्रियंका पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य गिताराम नरवडे,
रमेश शिंदे, हिंगणगाव सरपंच आबापाटील सोनवणे, जखणगाव सरपंच राजाराम कर्डिले, हमिदपूर सरपंच छबूराव कांडेकर, रहिमभाई शेख, रामचंद्र शिंदे आदिंसह आरोग्य सेविक व गट प्रवर्तक उपस्थित होते.