अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या मेनरोड वरील वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे.
या केंद्रावर प्रांत अधिकारी यांना काँग्रेस शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की,
नगराध्यक्ष यांचे वाहन चालक यांनी एका नगराध्यक्ष “समर्थक” इसमास नगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीत त्याचे नाव नसतानादेखील रांग मोडून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून लस देण्यास भाग पाडले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हे लस घेण्यापासून साठी तासनतास रांगेमध्ये उभे होते. असा आरोप उपनगराध्यक्ष ससाणे यांनी केला आहे.
सदर प्रकार स्पष्ट झाल्यानंतर उपनगराध्यक्ष ससाणेसह काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या कृत्यास हरकत घेतली. त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी या समर्थक व्यक्तीचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी नगराध्यक्षा यांचे ड्रायव्हर व समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस समर्थकांनी केली.