अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-नगर शहर व जिल्ह्यात पुन्हा कोरोनावरील कोविशील्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी नगर शहर व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांसह
जिल्हा शासकीय रुग्णालय ,तालुका उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रातील लस संपल्याने अनेकांना लस न घेतात परतावे लागली आहे.
दरम्यान कोविशिल्ड लस संपली असली तरी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे १२ हजार ५०० डोस गुरुवारीच जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत.
हे डोस केवळ जिल्हा शासकीय रुग्णालय व तालुका उपजिल्हा रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत. गुरुवारी देखील रेमडेसिवीरचा तुटवडा कायम होता.
नगर जिल्ह्याला आतापर्यंत तीन लाख डोस प्राप्त झाले अाहे. लसीकरण देखील ३ लाखांच्या पुढे झाले आहे.
नगर जिल्ह्याला आतापर्यंत तब्बल पंधरा वेळा कोरोना डोस प्राप्त झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला होता
मात्र फेब्रुवारी महिन्यापासून करून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढतच प्रतिसाद देखील वाढला होता. नगर शहर व जिल्ह्यात सर्व खाजगी व शासकीय यंत्रणेमार्फत १४ हजार जणांचे दररोज लसीकरण केले जात आहे.