अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवले जात आहे. या लसीकरणामुळे आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत.
मात्र सध्या हे लसीकरण फक्त ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे अशाच नागरिकांना होत आहे. देशात सर्व जाती धर्माचे साधू संत आहेत. की ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही.
त्यामुळे हे सर्व साधुसंत लस घेण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सरकारने या सर्व साधुसंतांचे लसीकरण आधारकार्ड शिवाय प्राधान्याने करून द्यावे.
नगर शहरात असलेले आनंदधाम हे जैन समाजाचे महत्त्वाचे स्थानक आहे. आज याठिकाणी अनेक साधू साध्वी वास्तव्यास आहेत.
अद्याप त्यांचेही लसीकरण झालेले नाहीये. जैन समजाच्या साधू संताचे तसेच सर्व जाती धर्माच्या साधूसंतांना लस देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी वसंत लोढा यांनी केली आहे.