अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव देखील हळूहळू कमी होऊ लागला आहे.
तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला असून 97 टक्क्यांच्या जवळपास पोहचला आहे. दरम्यान जिल्ह्यातील २४ केंद्रांवर गुरुवार अखेरपर्यंत ३० हजार ७९८ जणांना कोरोना लस देण्यात आली.
आतापर्यंत जिल्ह्यात ५१ टक्के लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार होती. कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आरोग्य केंद्र वाढवून ६४ ठिकाणी लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वाधिक ७५ टक्के लसीकरण कोपरगावमध्ये झाले असून, सर्वात कमी लसीकरण नगर शहरातील महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रात झाले.
या ठिकाणी २९.६१ टक्केच लसीकरण झाले. ३० हजार ७९८ जणांना लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागात ५४ टक्के लसीकरण झाले.