तर खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-देशभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. सध्या देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.

तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोविन ऍपवरून नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते.

तसेच सरकारने खासगी रुग्णालयांना देखील लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे लोक खासगी लसीकरण केंद्रात लस घेत आहेत, त्यांना या लशीसाठी शुल्क आकारलं जात आहे.

मात्र लवकरच खासगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकतात.

सिद्धरमैया यांनी पत्रात म्हटलं आहे की, “खासगी आरोग्य केंद्रांमध्ये लशीसाठी 250 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी देण्याचा सरकारने निर्णय घेतला.

पण यामुळे कोरोनापासून सर्वांना सुरक्षा देण्यात आणि कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांवर प्रतिकूल परिणाम होईल” सिद्धरमैया यांनी सांगितलं, “भारतात लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे.

देशात आतापर्यंत निम्म्या लोकांचंच लसीकरण झालं आहे. इतर देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाता आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24