Corona Virus : देशात आज रात्री 12 वाजल्यापासून 7 दिवसांचा लॉकडाऊन ; कोरोनाबाबत सरकारचा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Corona Virus :   जगात पुन्हा एकदा कोरोना हाहाकार माजवत आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या चीनमध्ये आतापर्यंत लाखो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने देखील भारतात अलर्ट जारी केला आहे.

तर दुसरकडे आता सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबद्दल अनेक मेसेज येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये देशात आजपासून पुढील सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन असल्याची माहिती देण्यात आली आहे. चला तर जाणून घ्या या व्हायरल मेसेजची हकीकत काय?

युट्युबवर व्हिडीओ व्हायरल होत आहे

यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की भारतात कोरोनाची चौथी लाट आली आहे, त्यामुळे सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करणार आहे.व्हिडिओमध्ये असे म्हटले जात आहे की सरकारने शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून भारताला 7 दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीई न्यूज नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे

यूट्यूबवर सीई न्यूज नावाचे चॅनल 7 दिवस देश बंद ठेवण्याचा दावा करत आहे. मात्र, सरकारकडून तसा कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे या व्हिडिओची चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1606603724813914113?s=20&t=j8gZIREjrMvIqintMPM5-Q

पीआयबी फॅक्ट चेकने व्हिडिओची वस्तुस्थिती तपासली  

पीआयबी फॅक्ट चेकच्या तपासणीत व्हिडिओ बनावट असल्याचे आढळले एका ट्विटमध्ये पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, यूट्यूबवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा आहे आणि भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना विषाणूबाबत देशातील सध्याची परिस्थिती पाहता अशा कोणत्याही बातम्यांकडे लक्ष देऊ नका किंवा अशा खोट्या बातम्या कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

हे पण वाचा :- Upcoming IPO:  होणार बंपर कमाई ! पुढील आठवड्यात ‘या’ कंपनीचा येणार आयपीओ ; वाचा सविस्तर माहिती