कोरोना योद्धा गुरुजी लसीपासून राहिले वंचित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे करोना संकट काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून सेवा करत होते. मात्र हे कोरोना योद्धा केंद्र सरकारच्या मोफत लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

करोना काळात मागील सन 2020 व सन 2021 मध्ये तालुका व जिल्हा सीमेवर, रेशन दुकानावर, विलगीकरण कक्षात, करोना सेंटर आयुर्वेद कॉलेज, शेवगाव, करोना सेंटर, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून सेवा बजावली.

परंतु, करोना फ्रंटलाईन वर्कर लसीकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी करोना संकट काळात सेवा बजावली नाही, असे लोक करोना लसीकरणाचे दुर्दैवाने लाभार्थी झाले आहेत.

करोना संकट काळात सेवा बजावणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळावा. अशी मागणी शिक्षकांच्या वतीने शेवगाव तहसिलदार अर्चना पागिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान 16 जानेवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून करोना संकट काळात सेवा बजावणार्‍या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर यांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शासकिय लसीकरण मोहिम मोफत स्वरूपात सुरू झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24