अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे कोविड -१९ मध्ये विशेष काम करणारया कोरोना योद्धाचा हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे कोरोनानंतर ग्रामसभा घेऊन त्यात यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे
पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. सदर पुरस्कार निवडीसाठी ग्रामस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार असून विविध निकषाच्या अधीन राहून कोरोना योद्धाची निवड केली जाणार आहे.
त्यात प्रामुख्याने
१) ज्या कुटुंबांनी कोरोना लक्षणे दिसल्याबरोबर तात्काळ कोरोना सुरक्षा समिती हिवरे बाजार किंवा ग्रामपंचायत हिवरे बाजार कडे संपर्क केला.
२)ज्या कुटुंबांनी कोरोनाला आपल्या घरात शिरकावच करू दिला नाही त्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक दखल घेऊन कोविडच्या सर्व नियमांचे पालन केले.
३)कोरोना संक्रमित किंवा कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यासाठी वाहतूक करणारे वाहनचालक.
४)ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्ण दाखल केले गेले त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल.
५) सिव्हील सर्जन शासकीय रुग्णालय अहमदनगर,प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव व प्राथमीक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार येथील डॉक्टर त्यांचे सर्व सहकारी व गावातील स्वयंसेवक यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले.