कोरोनाचा लहान मुलांवर वाईट परिणाम

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- कोरोना काळात मुलांना काही मानसिक आजारांशी झगडावे लागू शकते. त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.

त्यासाठी पुढील सल्ला उपयोगी ठरेल. . . मानसिक औदासिन्य आणि चिंता यामुळे सध्या किशोरवयीन मुले जास्त त्रासलेली आहेत. ते महामारीच्या आधी सुद्धा गैरवर्तन, खाणेपिणे या संबंधी आणि इतर मानसिक समस्यांशी झगडत होते.

आता त्यांना कोणा जवळच्याला गमावणे आणि शाळा- कॉलेजात परत जाणे यासारखे तणाव आहेत. अमेरिकी सीडीसीच्या नुसार मानसिक आरोग्य आणीबाणीच्या विभागांमध्ये ५-१९ वर्षे वयाच्या मुलांची व्हिजिट मागील वर्षी २४% वाढली. लहान मुले असोत किंवा किशोर औदासिन्य आणि चिंतेशी झुंजत असतील तर बोलणे अवघड होऊ शकते.

मुलांना विश्‍वास वाटू द्या : – किशोरवयीन मुलांशी चर्चा करा की, ते स्वत:मध्येच का हरविलेले असतात? किंवा ते जास्त काळ झोपण्यातच का घालवितात? त्यांना विश्‍वास द्या की, तुम्हाला त्यांच्याविषयी चिंता वाटते. अमेरिकन फाऊंडेशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शनच्या सीएमओ क्रिस्टिन माऊटियर म्हणतात की, त्यांना समजावून सांगा की, प्रत्येक आव्हानावर एकत्रितपणे मात करू शकता. त्यांना जाणीव करून द्या की, तुम्ही त्यांची पर्वा करता, तुम्हाला ते आवडतात त्यामुळे ते मोकळेपणी बोलू शकतील.

शिक्षक, मार्गदर्शक, डॉक्टरांशी चर्चा करा : – मुलांविषयी कोणत्याही विश्‍वासपात्र शिक्षक, मार्गदर्शक किंवा बाल रोग तज्ज्ञांशी चर्चा कग. त्यांना सांगा की, मुलगा अमुक कारणाने बाहेर कमी दिसतो. हे लोक मुलांना त्यांची समस्या सांगण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. ऑरैंज काउंटीमध्ये बाल मनोरोग विशेषज्ञ हीथर हुज्ती म्हणतात की, अशा मुलांना वाटत असते की, त्यांच्या भावनांना महत्त्व मिळावे. त्यांचे म्हणणे ऐकले जावे. समस्या सापडली तर उत्तर शोधणे सोपे जाते.

मुलांचा संकोच दूर करा, त्यांना एकटे सोडू नका : – मुलांना नेहमी वाटते की, जर त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्या तर कोणाला काय वाटेल? किंवा त्यांच्या चिंतांना खऱ्या मानणार नाहीत. म्हणून मुलांमधील संकोच दू, करणे आवश्यक आहे. कोलोराडो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये हेल्थ एक्सपर्ट हेइदी बास्कफील्ड सांगतात की, यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागतात. आणखी एक गरजेची गोष्ट म्हणजे, या स्थितीत मुलांना एकटे अजिबात सोडू नका. अशा वेळी ते नकारात्मक विचार करू शकतात.

मुलांसाठी हेल्पलाइन आणि काउंसलरची मदत घ्या : – जर समस्या सुटताना दिसत नसेल तर, चाइल्ड हेल्पलाइन किंवा काउंसेलरची मदत घेण्यासाठी संकोच करू नका. फिलाडेल्फिया चिल्ड्रन हॉस्पिटलच्या मुख्य मनोरोग विशेषज्ञ डॉ. टॅमी डी. बेनेटन म्हणतात की, अशा प्रकरणांमध्ये उशीर करायला नको. असे होऊ शकते की, मूल अशा कोणत्या समस्येशी झुंजत असेल, जी नातेवाईकांना सांगू शकत नसतील. अशा बाबतीत काउंसेलिंग मदत करणारे ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office