नियमांचा ब्रेक फेल झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची गाडी सुसाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यासह जिल्हापातळीवर पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

यातच नगर जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान नुकतेच नगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून श्रीरामपूर तालुक्यात काल 24 रुग्ण आढळून आले आहेत.

काल श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 10, खासगी रुग्णालयांमध्ये 13 तर अँटीजेन चाचणी तपासणीत 1 असे 24 रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनाचे उपचार करुन एकूण 1 रुग्ण घरी पाठविण्यात आला आहे.

फेब्रुवारीनंतर वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही प्रशासनाने वारंवार करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24